लाखोंचे बक्षिस असणाऱ्या 27 वॉंटेड नक्षलवाद्यांचे पोस्टर जाहीर

पोस्टर जाहीर करत नागरिकांना मदत करण्याचे पोलिसांचे आवाहन

नवी दिल्ली : झारखंडमधील नक्षलग्रस्त भागात नक्षली कारवायांसाठी सक्रिय असणाऱ्या 27 वॉंटेड नक्षलवाद्यांचे पोस्टर पोलिसांकडून जाहीर करण्यात आले आह. लातेहारसह आसपासच्या परिसरातील नक्षलवादी कारवायांमध्ये हे 27 नक्षलवादी सक्रीय होते. त्यांच्यावर लाखो रुपयांचे बक्षीसदेखील जाहीर करण्यात आले होते.दरम्यान, पोलीस अनेक दिवसांपासून या सर्व नक्षलवाद्यांचा शोध घेत आहेत. आज अखेर नक्षलवाद्यांचे पोस्टर पोलिसांनी जाहीर केले आहे. दरम्यान, पोस्टर जाहीर झाल्यानंतर पोलिसांना मदत होणार असल्याचे बोलले जात आहे.

पोलिसांनी या नक्षलवाद्यांचे पोस्टर प्रसिद्ध करून स्थानिक नागरिकांना या यासंदर्भात पोलिसांची मदत करण्याचे आवाहन केले आहे. पोलिसांकडून ज्या 27 नक्षलवाद्यांचे पोस्टर प्रसिद्ध केले गेले आहेत, त्यांच्यावर एक लाखांपासून ते तब्बल 25 लाखांपर्यंत बक्षीस देखील जाहीर करण्यात आलेल आहे.

या अगोदर झारखंड येथील पालमू जिल्ह्यात पाच नक्षलवाद्यांना अटक करण्यात स्थानिक पोलिसांना यश आले होते. झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन यांच्या सरकारच्या शपथविधी सोहळ्याअगोदर नक्षलवाद्यांनी स्फोट घडवला होता. नक्षलवाद्यांनी एक इमारतच स्फोटकांनी उद्धवस्त केली होती.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.