पोस्टरबाजी भोवली; महानगरपालिकेचा शिवसेनेला दणका

मुंबई – विधानसभा निवडणुकीनंतर कुठलाही पक्ष सरकार स्थापन करू शकत नसल्यानं महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी, या राज्यपालांच्या शिफारशीनंतर राज्यात ‘राष्ट्रपती राजवट’ लागू झाली. अशातच शिवसेनेचा मुख्यमंत्री म्हणून लागलेले वांद्रे परिसरातील राजकीय बॅनर्स मुंबई महापालिकेने हटविले आहेत.
दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राहत असलेले निवासस्थान मातोश्री बंगल्याबाहेर हे बॅनर्स लावण्यात आलेले होते. तसेच भाजप आणि शिवसेना युतीला बहुमत मिळाले होते. जरी हे बहुमत मिळाले असले तरी या दोन्ही पक्षांमध्ये मुख्यमंत्रीपदावरून युद्ध रंगले होते.
यातच शिवसेनेचाच मुख्यमंत्री व्हावे अशी शिवसैनिकांची इच्छा होती. तसेच आदित्य ठाकरेंना यांनाही मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून पाहिलं जातं होतं. काही शिवसैनिकांनी मातोश्री बाहेर अशा प्रकारचे बॅनर्स लावून इच्छा दाखवून दिली होती. आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रिपदाचे बॅनर्स लावण्यात आलेले होता. मात्र मुंबई महापालिकेने हे सर्व बॅनर्स उतरविले आहे.





