शाहिद कपूरच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर रिलीज; सुप्रसिद्ध अभिनेत्रीची होणार एन्ट्री

Shahid Kapoor | बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरच्या आगामी चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. विशाल भारद्वाज यांनी शाहिद कपूर अभिनीत आगामी चित्रपटाच्या नावाची घोषणा केली आहे. यापूर्वी शाहिदने विशाल भारद्वाज यांच्या दिग्दर्शनाखाली ‘कमिने’ आणि ‘हैदर’ यांसारख्या आपल्या कारकिर्दीतील उत्कृष्ट चित्रपट दिले आहेत. शाहिदच्या या आगामी चित्रपटाचे नाव ‘ओ रोमियो’ आहे. अलीकडेच निर्मात्यांनी या चित्रपटाची रिलीज डेट, पहिले पोस्टर रिलीज केल आहे.
‘ओ रोमियो’ या टायटलवरून असा अंदाज बांधला जात आहे की हा एक रोमँटिक ड्रामा चित्रपट असू शकतो. इतकेच नव्हे, तर या चित्रपटाची रिलीज डेटही खूप खास आहे. हा चित्रपट 2026 च्या व्हॅलेंटाईन डे निमित्त रिलीज होणार आहे. हा चित्रपट यापूर्वी 5 डिसेंबर 2025 रोजी रिलीज होणार होता. पण या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. या चित्रपटात शाहिदसोबत रणबीर कपूरच्या 900 कोटी कमावणाऱ्या ‘अॅनिमल’ फेम अभिनेत्री तृप्ति डिमरी दिसणार आहे.
View this post on Instagram
या नव्या पोस्टरमध्ये शाहिद कपूरने मोठी टोपी घातली असून, त्याचा चेहरा पूर्णपणे झाकलेला दिसत आहे. यासोबतच चित्रपटाचे टायटल ट्रॅकही शेअर करण्यात आला आहे, ज्याला अरिजीत सिंग यांनी आपला आवाज दिला आहे. ‘ओ’ रोमियो’मध्ये शाहिदसोबतच दिग्गज अभिनेते नाना पाटेकर देखील पाहायला मिळणार आहे. तसेच फरीदा जलाल, रणदीप हुड्डा आणि दिशा पटानी हे कलाकारही चित्रपटात दिसणार आहेत. Shahid Kapoor |
हेही वाचा:
पूजा खेडकरच्या आई मनोरमा यांचा नवा कारनामा! ट्रक चालकाचे अपहरण करून पुण्यातील घरात डांबले





