नवी दिल्ली – जर तुमचे पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते आहे, तर पैसे जमा करण्यासाठी आणि काढण्यासाठी आता शुल्क भरण्यासाठी तयार रहा. कारण 1 एप्रिल पासून पोस्ट ऑफिसचे नवीन नियम लागू केले जाणार आहेत.नवीन नियमाप्रमाने इंडिया पोस्ट पेमेंट्स बॅंकने ग्राहकांकडून पैसे जमा करणे आणि काढण्यासाठी अतिरिक्त शुल्क आकारला जाणार आहे. या व्यतिरिक्त आता आधार सक्षम पेमेंट सिस्टम करण्यासाठी अतिरिक्त शुल्क भरावा लागणार आहे. परंतु ग्राहकांना माहित आसायला हवं की, त्यांना अतिरिक्त शुल्क तेव्हाच भरायला लागेल, जेव्हा मर्यादा पार केली असेल.
काय आहे नवीन नियम
1. नवीन नियमानुसार मूलभूत बचत खात्यामधून एका महिन्यात चारवेळा व्यवहार केल्यावर त्यावर कोणताही शुल्क आकारला जाणार नाही. त्यानंतर पैसे काढण्यावर 0.50 टक्के किंवा 25 रुपये व्यवहार शुल्क म्हणून आकारला जाईल.
- बचत खाते आणि चालू खाते असल्यास आपण दरमहा 25,000 रुपयांपर्यंत रक्कम काढू शकता. त्यावर कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. परंतु अधिक पैसे काढण्यासाठी 0.50 टक्के किंवा किमान 25 रुपये शुल्क भरावे लागेल.
-
ग्राहक दरमहा 10.000 रुपयांपर्यंत रक्कम जमा करू शकतात, त्यांच्याकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. यापेक्षा जास्त रक्कम जमा करण्यासाठी त्यांना जमा करावयाच्या रक्कमेपैकी 0.50 टक्के किंवा प्रत्येक ठेवीसाठी किमान 25 रुपये द्यावे लागतील.
-
आपल्याकडे आयपीपीबी नसलेले खाते असल्यास आपण तीनवेळा विनामूल्य व्यवहार करू शकता. हे नियम मिनी स्टेटमेंट, रोख रक्कम काढणे आणि रोख ठेव यासाठी आहेत. विनामूल्य मर्यादा संपल्यानंतर, प्रत्येक व्यवहारावर शुल्क भरावे लागेल. मर्यादा संपल्यानंतर कोणत्याही ठेवीवर 20 रुपये शुल्क भरावे लागेल.
5.याशिवाय निधी हस्तांतरणासाठी 5 रुपये आकारले जातील. सर्व खातेधारकांना आयपीपीबीमध्ये किमान 5,00 रुपये शिल्लक ठेवावी लागेल. जर तुमच्या खात्यात किमान शिल्लक नसेल तर 100 रुपये अतिरिक्त शुल्क आकारले जाईल.
सध्या पोस्ट ऑफिसमध्ये या लहान बचत योजना आहेत
(1) सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी
(2) सुकन्या समृद्धि योजना
(3) ज्येष्ठ नागरिक बचत योजना
(4) राष्ट्रीय बचत पत्र
(5) किसान विकास पत्र
(6) पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट 5 वर्षासाठी