“सकारात्मक दृष्टिकोनातून परीक्षेला सामोरे जावे’

पिंपळे गुरव : दहावीची परीक्षा म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा असतो. विद्यार्थ्यानी कोणत्याही प्रकारचे दडपण न घेता सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन धैर्याने या परीक्षेला सामोरे जावे, असे आवाहन शिवव्याख्याते प्रा. इंद्रजीत भोसले यांनी केले.
पिंपळे गुरव येथील जिनियस क्‍लासेसतर्फे दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित शुभेच्छा समारंभप्रसंगी “परीक्षेला सामोरे जाताना’ या विषयावर प्रा. इंद्रजीत भोसले यांचे व्याख्यान झाले.

या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून शकुंतलाबाई शितोळे विद्यामंदिरचे मुख्याध्यापक व नवी सांगवी येथील सातारा मित्र मंडळाचे अध्यक्ष शिवाजीराव माने, मंडळाचे उपाध्यक्ष संजय चव्हाण, किलबील हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. योगेश्‍वर भंडारे, न्यू मिलेनियम इंग्लिश मीडियम स्कूलचे व्यवस्थापक देवराम पिंजण, सातारा मित्रमंडळाचे उपाध्यक्ष चव्हाण, निवेदक नामदेव तळपे, बलभीम भोसले, प्रा. बालाजी टेंकाळे, अभियंता रोहित शर्मा, क्‍लासचे संचालक प्रा. महादेव मासाळ, संचालिका तेजस्विनी मासाळ आदींसह शिक्षक, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

या वेळी मुख्याध्यापक शिवाजीराव माने, नामदेव तळपे, प्रा. भंडारे आदींनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या वेळी साक्षी जावळे, श्रुती कापसे, साक्षी कळसकर, संकेत शिंदे, प्रशांत देशमुख आदी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्‍त केले. क्‍लासचे संचालक प्रा. मासाळ यांनी आभार मानले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.