Pornography Case : अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला पोलीस कोठडी
Updated On:

मुंबई – अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि मुंबईतील एक व्यावसायिक राज कुंद्रा याला अश्लिल चित्रफिती तयार केल्याच्या कारणावरून अटक करण्यात आली असून त्यांची 23 जुलै पर्यंत पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
सोमवारी रात्री त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. मोठ्या आर्थिक लाभासाठी कुंद्रा हे हा व्यवसाय करीत होता व त्या संबंधातील पुरेसा पुरावा पोलिसांकडे उपलब्ध असल्याने त्याला अधिक पोलिस कोठडी द्यावी अशी मागणी पोलिसांकडून कोर्टात करण्यात आली होती.
कुंद्रा याच्या समवेतच त्यांचा या प्रकरणातील साथीदारही ताब्यात घेण्यात आला आहे. रियान थोर्प असे त्याचे नाव आहे. कुंद्राचा फोन व अन्य सामग्रीही पोलिसांनी जप्त केली आहे.





