लोकप्रिय अभिनेत्री करतेय गंभीर आजाराचा सामना; भावुक होत केला खुलासा

Priya Mohan | मल्याळम आणि तेलगू अभिनेत्री प्रिया मोहन एका गंभीर आजाराचा सामना करत आहे. प्रियाला फाइब्रोमायल्जिया (fibromyalgia) या आजाराचे निदान झाले आहे. ज्यामुळे तिला अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. शरीरात सतत वेदना होतात, दमल्यासारखं वाटते, डोकं दुखते आणि मूड स्विंग्स होतात, असे तिने सांगितले आहे.
फाइब्रोमायल्जिया आजारानं त्रस्त
प्रिया मोहननं नुकताच पती निहाल पिल्लईसोबत एक व्लॉग शेअर करत तिच्या आजाराविषयी सांगितले आहे. प्रियानं म्हणाली की, “दीड वर्षांमध्ये हा त्रास वाढत गेला. ज्याकडे सुरुवातीला सगळ्यांनी दुर्लक्ष केलं. माझी अवस्था इतकी खराब झाली की रोजच्या जीवनातील कामं करायला देखील अडचणी येत होत्या. मी इतक्या वेदनेत होते की माझ्या मुलाला उचलूही शकत नव्हते. अंघोळीनंतर केस पुसण्यासाठी टॉवेल गुंडाळणेही कठीण झाले होते, ज्यामुळे ती डिप्रेशन आणि झोप न येण्याच्या समस्या होऊ लागल्या.” Priya Mohan |
View this post on Instagram
प्रिया मोहन तिच्या या वेदनेविषयी बोलत असताना तिला अश्रू अनावर झाले आणि ती म्हणाली, “मी इतक्या वेदनेत होते की मी माझ्या मुलाला देखील उचलू शकत नव्हते किंवा तिला जेवणही खाऊ घालू शकत नव्हते. जर गाडी थोडी उंच असेल तर मला चढायला देखील त्रास व्हायचा. अंथरुणातून उठायला, कपडे बदलायला इतकंच काय तर पाठ खाजवायला देखील दुसऱ्या कोणाची मदत लागायची. मी ताट किंवा ग्लास देखील उचलू शकत नव्हती. मी अनेकदा विचार करत होते की मला अशा प्रकारे का जगावे लागते आहे.”
परदेशात फिरायला गेल्यानंतर प्रियाला या गोष्टीची जाणीव झाली की ‘तिच्या शरिरात काहीतरी गडबड सुरु आहे. एक दिवस रात्री अंघोळ करताना ती बाथरुममध्ये पडली. तिनं स्वत: ला उचलण्याचा प्रयत्न केला. पण तिच्या हातात आणि पायात इतकी ताकत नव्हती की ती उठू शकेल. तिनं तिच्या पतीला आवाज दिला आणि त्यावेळी तो बाजुच्या रूममध्ये शांत झोपला होता. प्रिया वेदना होत असताना कशी तरी त्या रुममध्ये पोहोचली. मुळात मी माझ्यावरचा ताबा गमावून बसले होते मला स्वत: ला सांभाळता येत नव्हतं. जर अशा अवस्थेत कोणत्या रुग्णानं उपचार केला नाही, तर तो नक्कीच डिप्रेशनमध्ये जातो.” प्रियाने या आजाराविषयी खुलासा केल्यानंतर अनेकांनी तिला काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. Priya Mohan |
हेही वाचा:
दिल्लीत एनआयएकडून सीआरपीएफ जवानाला अटक ; पाकला पाठवत होता भारताची संवेदनशील माहिती





