व्हॅटिकन सिटी : तंत्रज्ञानाच्या माध्यमातून श्रद्धेचा प्रसार करणाऱ्या १५ वर्षीय संगणक तज्ज्ञ युवकाला ख्रिश्चनांचे सर्वोच्च धर्मगुरू पोप लिओ १४ वे यांनी संतपद जाहीर केले आहे. कार्लो ऍक्युटिस असे या १५ वर्षीय युवकाचे नाव आहे. तंत्रज्ञानाच्या आधारे श्रद्धेचा प्रसार करणाऱ्या व्यक्तीला कॅतोलिक चर्चने पहिल्यांदाच संत म्हणून घोषित केले आहे. व्हॅटिकन सिटीतल्यासेंट पीटर्स चौकात झालेल्या सामुदायिक प्रार्थनासभेमध्ये तब्बल ८० हजार भाविकांना संबोधित करताना पोप यांनी कार्लो ऍक्युटिस याला संत म्हणून घोषित केले. पोप लिओ यांनी इटलीचे पीअर जिओर्जिओ फ्रासाति यांनाही संत म्हणून यावेळी घोषित केले. कार्लो ऍक्युटिस आणि जिओर्जिओ फ्रासाति या दोघांनी आपले जीवन देवाला समर्पित करून आपल्या आयुष्यापेक्षाही जास्त उत्कृष्ठ योगदान दिले आहे, असे पोप यावेळी म्हणाले. कार्लो ऍक्युटिस याचा जन्म ३ मे १९९१ साली लंडनमध्ये झाला होता. श्रीमंत असलेल्या ऍक्युटिस यांचे कुटुंबीय त्याच्या बालपणीच मिलान येथे स्थायिक झाले. ऍक्युटिस याला लहानपणापासूनच संगणाचे वेड होते. युवावस्थेतच त्याने प्रोग्रॅमिंगविषयी महाविद्यालयिन पातळीवरील पुस्तकांची निर्मिती केली होती. चर्चने मान्यता दिलेल्या चमकत्कारांविषयी बहुभाषिक वेबसाईटची निर्मितीही केली होती. वयाच्या १५ व्या वर्षी तो रक्ताचा कर्करोग झाल्याचे निदान झाले. अल्पावधीतच त्याचे निधन झाले. रविवारी संतपद झाहीर झालेल्या फ्रासाति यांचा जन्म १९०१ साली झाला आणि पोलिओमुळे २४ व्या वर्षी १९२५ साली त्यांचा मृत्यू वयाच्या झाला. गरीबांची सेवा आणि मित्रांमध्ये श्रद्धेचा प्रसार करण्यासाठी त्यांनी समाजसेवेचे व्रत स्वीकारले होते.