पिंपरी | शहरातील भुयारीमार्गांची दुरवस्था, भुयारीमार्गंतील सुविधा अपुऱ्या

पिंपरी, (प्रतिनिधी) – रस्ते ओलांडताना छोटा-मोठे अपघात होवू नये. आणि वहातुक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी भुयारीमार्गाचा वापर केला जाताो. मात्र जसा-जसा काळ गेला तसा-तसा भुयारी मार्गाकाकडे पालिकेचे दुर्लक्ष होत गेले. सध्या पिंपरी मधील काही भुयारी मार्गंची अवस्था पाहता, भुयारीमार्गंचा नेमका वापर कशासाठी असा प्रश्न पडत आहे.
नागरिकांच्या सोयीसाठी तयार करण्यात आलेला पादचारी भुयारी मार्गमध्ये, आता तळीरामांचा आड्डा तयार होताना दिसत आहे. तसेच भुयारीमार्गंत जाळया तयार झाल्या आहेत. विषेशता चिंचवड स्टेशन येथील भुयारी मार्गात यापूर्वी शहराच्या सौंदर्यात भर पाडणाऱ्या स्थळांचे माहिती फलक लावण्यात आले होते.
परंतु त्यातील एकही फलक आता त्याठिकाणी दिसत नाही. त्यामुळे भुयारी मार्गची विद्रूपिकरणातही भर पडलेली दिसून येत आहे. शहरातील चिंचवड स्टेशन येथील, डी मार्टजवळील भुयारीमार्ग, काळेवाडीतील एम. एम. हायस्कूलजवळील भुयारीमार्ग आणि कै. संदिप वसंतराव शेवडे भुयारी मार्ग तसेच पिंपरीतील कै. किंमतराव ह.आसवाणी (कबड/डीपटटू) या भुयारीमार्गांची अवस्था बिकट झाल्याची दिसत आहे.
चिंचवड स्टेशन येथील भुयारीमार्ग – शहराच्या सौंदर्यात भर पाडणाऱ्या स्थळांचे माहिती फलक या भुयारीमार्गात लावण्यात आले होते. येथून ये-जा करणाऱ्या नागरिकांना या फलकांमुळे शहरातील पर्यटनस्थळांची माहिती मिळत असे. यामुळे भुयारी मार्गाचे त्यावेळी सुशोभिकरण झाले होते. परंतु आता त्याचेच विद्रूपिकरण झाले आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला मॉल आणि बँका आहेत. त्यामुळे या भुयारी मार्गात नागरिकांची सतत वर्दळ असते. तर भुयारीमार्गावरील वीज दिवे पुरेसे नाहीत. सीसीटीव्हीही नाही, तसेच त्यांचे काम व्यवस्थितपणे झाले नाही.
काळेवाडीतील एम. एम. हायस्कूलजवळील पादचारी भुयारी मार्ग – या पादचारी भुयारी मार्गाजवळच शाळा व महाविद्यालय असल्याने या मार्गाचा वापर विद्यार्थी करत असतात. रात्रीच्या वेळी या मार्गात मद्यपींचा वावर असतो. त्यामुळे महिला आणि लहान मुलांना येथून ये-जा करणे भीतिदायक वाटते. मद्यपींनी येथील भिंतीवर तंबाखू खाऊन थुंकल्यामुळे भिंती घाण झाल्या आहेत.
कै. किंमतराव ह.आसवाणी भुयारीमार्ग – या भुयारीमार्गत वीज दिवे पूरेसे नाहीत. भुयारी मार्गातील भिंतीचे रंगही खराब झाले आहेत. या भुयारी मार्गाचा वापर करताना, नागरिकांची गैरसोय होत आहे. अशीच अवस्था शहरातील अनेक भुयारीमार्गची झालेली दिसत आहे. त्यामुळे भुयारीमार्गांचे दुरुस्ती करुन सुरक्षेचे उपाय करावेत, आणि या सर्व भुयारीमार्गाची पहाणी करुन त्याची चौकशी करावी, तसेच या भुयारी मार्गाची स्वच्छता करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
किंमतराम ह.आसवाणी या भुयारीमार्गत एकाच साईड लाईट असल्याने या भुयारीमार्गात सांयकाळी ६ च्या वेळी अंधार पडलेला दिसतो. तसेच वळणाच्या ठिकाणीच चार चाकी पार्क केल्याने येथे अपघात होण्याची शक्यता आहे. -सागर कदम, नागरिक





