पिंपरी | कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत रस्त्यांची दुरवस्था
Updated On:

देहूरोड, (वार्ताहर) – देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत अनेक ठिकाणच्या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. आंबेडकर मार्ग, शितळानगर ते मामुर्डी दरम्यानचा रस्ता, कात्रज-देहूरोड बाह्यवळण मार्गाला जोडणारा रस्ता यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे.
त्यामुळे येथे सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे. देहूरोड परिसरातील अंतर्गत रस्ते, आंबेडकर मार्ग, शितळानगर, मामुर्डी दरम्यानचा रस्ता येथे खड्डेच खड्डे दिसत आहेत.
अनेक ठिकाणी रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. येथून वाहने चालविताना जशी वाहन चालकांना कसरत करावी लागते, तसेच पादचाऱ्यांना देखील जीव मुठीत धरून चालावे लागते. हे सर्व रस्ते तातडीने दुरुस्त करावे, खड्डे भरावे, रस्त्यांचे रुंदीकरण करावे अशी मागणी नागरिक करीत आहेत.





