नवी दिल्ली – शत्रुघ्न सिन्हा यांची पत्नी पूनम सिन्हा या सर्वात श्रीमंत उमेदवारापकी एक ठरल्या आहेत. पाचव्या टप्प्यातील 184 कोट्यधीश उमेदवारांमध्ये समाजवादी पक्षाच्या उमेदवार पूनम सिन्हा यांचा समावेश आहे. पूनम सिन्हा या लखनौ येथून लोकसभा निवडणूक लढवत आहेत.
असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स नावाच्या संस्थेच्या अहवालात ही माहिती नमूद आहे. पाचव्या टप्प्यात जे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत, त्यांच्यापैकी 28 टक्के उमेदवार कोट्यधीश आहेत. पूनम सिन्हा यांच्याकडे 1 अब्ज 93 कोटी रुपयांची संपत्ती आहे.
या अहवालानुसार लोकसभा निवडणुकीत उतरलेल्या उमेदवारांची सरासरी संपत्ती 2.57 कोटी इतकी आहे. तर मोठ्या राजकीय पक्षांच्या उमेदवारांची सरासरी संपत्ती 6.9 कोटी इतकी आहे.