पूनम पांडेला दिली अ‍ॅसिड हल्ल्याची धमकी

मुंबई –  हैदराबाद येथील पशुचिकित्सक महिलेवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणाचे तीव्र पडसाद संसदेपासून संपूर्ण देशभरात सध्या उमटत आहेत. देशात हैदराबादची घटना ताजी असतानाच बॉलिवूडची बोल्ड अभिनेत्री पूनम पांडे हिने ट्विटद्वारे  तिच्या  सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे.

अभिनेत्री पूनम पांडे हिने ट्विट केले आहे की,’माझा नंबर मोबाईल अ‍ॅपवरुन सार्वजनिक करण्यात आला आहे, याबाबत मी गुगलकडे सातत्याने लेखी तक्रार दिलीय. पण, कुठलिही कारवाई झाली नाही. मला, बलात्कार आणि अॅसिड हल्ल्याच्या धमक्या मिळत आहेत. त्यामुळे मी दिवसांतील 24 तास भितीदायक वातावरणात जगत आहे. सर, तरी आपण मला मदत करा.’

दरम्यान, पूनम  पांडेने केलेल्या या ट्विटला काही वेळातच मुंबई पोलिसांनी  रिप्लाय दिला. आम्ही तुमच्या विनंती दखल घेत आहोत. तुमच्या संपर्क क्रमांकाबद्दल आम्हाला थेट मेसेज करा, असे मुंबई पोलीस आयुक्तांच्या ट्विटर अकाऊंटवरुन म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.