पुणे -पूना क्लब आयोजित ग्रॅविटस फाउंडेशन प्रायोजित, कॉनव्हेक्स सहप्रायोजित पूना क्लब रॅकेट लीग स्पर्धेत पॅंथर्स संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला. पूना क्लबच्या कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत पॅंथर्स संघाने लायन्स संघाचा 263-184 असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली. बॅडमिंटनमध्ये पॅंथर्स संघाला लायन्सकडून 49-60 असा पराभव स्वीकारावा लागला. मात्र, स्क्वॅशमध्ये समीर सालियन, प्रतिश थडानी, किरण भंडारी यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर पॅंथर्स संघाने लायन्स संघाचा 72-35 असा पराभव करून आघाडी घेतली. त्यानंतर टेबल टेनिसमध्ये अरण थवानी/रक्षय ठक्कर, तितिक्षा पवार/आदित्य थोरात यांच्या सुरेख खेळीच्या जोरावर पॅंथर्स संघाने लायन्स संघाचा 70-53 असा, तर टेनिसमध्ये पॅंथर्स संघाने लायन्स संघाचा 72-36 असा पराभव करून विजय मिळवला. दुसऱ्या सामन्यात किंग्ज संघाने वेकफिल्ड संघाचा 273-213 असा पराभव करून आगेकूच केली.