Pomegranate Benefits: “डाळिंबच नव्हे, सालीही गुणकारी; बद्धकोष्ठता आणि त्वचेसाठी घरगुती रामबाण उपाय”
Pomegranate Benefits डाळिंब हे एक संपूर्ण औषधी गुणधर्म असलेले फळ मानले जाते. त्याचे दाणे, फुले आणि साल तिन्ही गोष्टी आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. आयुर्वेदानुसार डाळिंब शरीरातील वात, पित्त आणि कफ या तिन्ही दोषांना संतुलित ठेवते. यामुळे शरीर निरोगी राहण्यास मदत होते.

Pomegranate Benefits: आपण सगळेच डाळिंब खाताना त्याचे दाणे आवडीने खातो, पण त्याची साल मात्र कचऱ्यात टाकतो. मात्र आयुर्वेदानुसार डाळिंबाची साल ही दाण्यांइतकीच नव्हे तर काही वेळा त्याहूनही अधिक गुणकारी मानली जाते. त्यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर शरीरासाठी अत्यंत उपयुक्त असतात.
डाळिंब हे एक संपूर्ण औषधी गुणधर्म असलेले फळ मानले जाते. त्याचे दाणे, फुले आणि साल तिन्ही गोष्टी आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. आयुर्वेदानुसार डाळिंब शरीरातील वात, पित्त आणि कफ या तिन्ही दोषांना संतुलित ठेवते. यामुळे शरीर निरोगी राहण्यास मदत होते. Pomegranate Benefits
विशेषतः पोटाच्या समस्यांसाठी डाळिंबाच्या सालीचा उपयोग खूप प्रभावी ठरतो. आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे अपचन, जुलाब, गॅस आणि बद्धकोष्ठता यांसारख्या समस्या वाढल्या आहेत. अशा वेळी डाळिंबाच्या सालीचे चूर्ण खूप फायदेशीर ठरते. हे चूर्ण ताकामध्ये मिसळून त्यात थोडे भाजलेले जिरे घालून घेतल्यास पचनक्रिया सुधारते आणि आतड्यांतील सूज कमी होते. Pomegranate Benefits
Pomegranate
याशिवाय, डाळिंबाच्या सालीत अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे त्वचेसाठी खूप उपयुक्त आहेत. चेहऱ्यावर येणारे मुरुम, डाग-धब्बे यावरही हा एक नैसर्गिक उपाय आहे. डाळिंबाच्या सालीचे चूर्ण गुलाबपाण्यात मिसळून त्याचा फेसपॅक तयार करून आठवड्यातून दोन वेळा वापरल्यास त्वचेला नैसर्गिक चमक येते आणि त्वचा स्वच्छ राहते. Pomegranate Benefits
बद्धकोष्ठता आणि मूळव्याध यांसारख्या समस्यांमध्येही डाळिंबाची साल उपयोगी ठरते. सालीचे चूर्ण ताकासोबत घेतल्यास पचन सुधारते आणि मलविसर्जन सुलभ होते. त्यामुळे पोट साफ राहते आणि मूळव्याधीचा त्रास कमी होतो. Pomegranate Benefits
लहान मुलांच्या बाबतीतही डाळिंब उपयुक्त आहे. मुलं अनेकदा हात न धुता खाणं खातात, त्यामुळे त्यांच्या पोटात जंत होण्याची शक्यता असते. अशा वेळी रोज डाळिंबाचे दाणे खाल्ल्यास पोटातील जंत नष्ट होण्यास मदत होते. तसेच डाळिंबामुळे शरीरातील हिमोग्लोबिनची पातळीही वाढते.
आरोग्यतज्ज्ञ सांगतात की, डाळिंबाचा रस पिण्यापेक्षा त्याचे दाणे चावून खाणे अधिक फायदेशीर असते. कारण रसात फायबरचे प्रमाण कमी असते, तर दाण्यांमध्ये भरपूर फायबर असते, जे पचन सुधारण्यास मदत करते.
एकंदरीत, डाळिंबाची साल ही फक्त टाकून देण्याची वस्तू नसून ती आरोग्याचा खजिना आहे. त्यामुळे पुढच्या वेळी डाळिंब खाताना त्याची साल फेकू नका, तर योग्य पद्धतीने वापर करून त्याचे फायदे घ्या.





