सातव्या टप्प्यात सकाळी 11 वाजेपर्यंत 26 टक्के मतदान ; बिहार-ओडिशामध्ये संथगतीने मतदान

polling till 11 am । लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात शनिवारी सात राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील 57 जागांसाठी मतदान होत आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघाचाही समावेश आहे. ज्या जागांवर आज मतदान होत आहे त्यामध्ये पंजाब आणि यूपीमधील प्रत्येकी 13 जागा, पश्चिम बंगालमधील 9 जागा, बिहारमधील 8 जागा, ओडिशातील 6 जागा, हिमाचल प्रदेशातील 4 जागा, झारखंडमधील 3 जागा आणि चंदीगडमध्ये एक जागा आहे.
बिहार-ओडिशामध्ये संथगतीने मतदान polling till 11 am ।
दरम्यान. या निवडणुकीसाठी होत असलेल्या मतदानाची सकाळी 11 वाजेपर्यंतची आकडेवारी समोर आलीय. यामध्ये हिमाचल प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये जास्त मतदान झाले आहे. तर तिकडे बिहार आणि ओडिसामध्ये मंद मतदान प्रक्रिया पार पडत आहे.
Odisha records 22.97% voter turnout till 11 am in the fourth phase of elections to its State Legislative Assembly. pic.twitter.com/E1s7AUcetW
— ANI (@ANI) June 1, 2024
या टप्प्यात अनेक दिग्गजांचे भवितव्य पणाला लागले आहे. या टप्प्यात केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर हमीरपूरमधून, ममता बॅनर्जी यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी डायमंड हार्बरमधून, लालूप्रसाद यांची कन्या मीसा भारती पाटलीपुत्रमधून आणि अभिनेत्री कंगना राणौत मंडी मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.
सकाळी 11 वाजेपर्यंत 26.30% मतदान polling till 11 am ।
लोकसभा निवडणुकीच्या 7 व्या टप्प्यात 2024 मध्ये सकाळी 11 वाजेपर्यंत 26.30% मतदान झाले आहे. बिहारमध्ये 24.25%, हिमाचल प्रदेशात 31.92%, झारखंडमध्ये 29.55%, ओडिशामध्ये 22.64%, पंजाबमध्ये 23.91%, उत्तर प्रदेशमध्ये 28.02%, पश्चिम बंगालमध्ये 28.10%, चंदीगडमध्ये 25.03% मतदान झाले.





