पोलार्डची वादळी खेळी, त्रिनबॅगो विजयी
Updated On:

जमैका – वेस्ट इंडिजचा आक्रमक फलंदाज कॅरन पोलार्ड याने 28 चेंडूत 2 चौकार व तब्बल 9 षटकारांची आतषबाजी करत 72 धावांची खेळी करून त्रिनबॅगो नाईट रायडर्स संघाला विजय मिळवून दिला.
कॅरेबियन क्रिकेट लीग टी-20 स्पर्धेत पोलार्डच्या खेळीने बार्बाडोस ट्रायडंट्स संघाच्या गोलंदाजीवर अत्यंत आक्रमकपणे फलंदाजी करत पोलार्डने आगामी आयपीएल स्पर्धेतील अन्य संघांना धोक्याचा इशाराच दिला असून त्याच्या खेळीवर त्याच्या मुंबई इंडियन्स या आयपीएलमधील संघाने आनंद व्यक्त केला आहे.





