Two-Language Policy : तामिळनाडूमध्ये द्वि-भाषा धोरणच राहील; राज्य सरकारने केले स्पष्ट
तामिळनाडूतील सत्ताधारी पक्ष, तामिळनाडू वेत्री कळघम (टीव्हीके) च्या सरकारने राज्याचे दीर्घकाळ चालत आलेले द्वि-भाषा धोरण (Two-Language Policy) सुरू ठेवणार असल्याचे जाहीर केले आहे.

Two-Language Policy : तामिळनाडूतील सत्ताधारी पक्ष, तामिळनाडू वेत्री कळघम (टीव्हीके) च्या सरकारने राज्याचे दीर्घकाळ चालत आलेले द्वि-भाषा धोरण (Two-Language Policy) सुरू ठेवणार असल्याचे जाहीर केले आहे.
मुख्यमंत्री जोसेफ विजय यांच्या सरकारमधील शालेय शिक्षण मंत्री राजमोहन यांनी स्पष्ट केले की, सध्याच्या सरकारच्या (Two-Language Policy) काळात या धोरणात कोणताही बदल होणार नाही.
शालेय शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबतच्या पहिल्या आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना राजमोहन म्हणाले की, राज्यातील शाळांमध्ये तमिळ आणि इंग्रजी ही द्वि-भाषा प्रणाली सुरूच राहील. त्यांनी याला तामिळनाडू आणि टीव्हीके सरकारची मूळ विचारधारा असल्याचे म्हटले.
शालेय शिक्षणमंत्री राजमोहन म्हणाले, “इंग्रजी पुरेशी आहे आणि टीव्हीके कोणत्याही प्रकारच्या अप्रत्यक्ष दबावाला बळी पडणार नाही. पक्षाची तत्त्वे आणि विचारधारेवर कोणतीही तडजोड केली जाणार नाही.” राजमोहन म्हणाले की, राज्यात संवादासाठी तामिळ ही प्राथमिक भाषा राहील, तर बाहेरील जगाशी आणि जागतिक संधींशी संपर्क साधण्यासाठी इंग्रजी हे माध्यम असेल. “द्विभाषा धोरण ही टीव्हीकेची घोषित विचारधारा आहे,” असे ते म्हणाले.






