Mamata Banerjee : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी बुधवारी आपल्या पक्षाच्या उमेदवारांना निवडणूक प्रक्रियेबाबत सावध राहण्याचे आवाहन केले आहे. निवडणूक आयोगाने नियुक्त केलेले नवीन अधिकारी तृणमूलच्या (Mamata Banerjee) उमेदवारांची नामनिर्देशन पत्रे जाणीवपूर्वक फेटाळू शकतात, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. बीरभूम जिल्ह्यातील नानूर येथे एका प्रचारसभेला संबोधित करताना बॅनर्जी म्हणाल्या, राज्यातील निवडणूक यंत्रणेत मोठे बदल करण्यात आले आहेत. हा एक नवीन सेटअप असून, या नवीन अधिकाऱ्यांवर तुमची नामनिर्देशन पत्रे फेटाळण्याची जबाबदारी सोपवण्यात आल्याची शक्यता आहे. त्यामुळे उमेदवारांनी अर्ज भरताना अत्यंत सावधगिरी बाळगावी, असे आवाहन ममतांनी आपल्या उमेदवारांना केले. Mamata Banerjee यावेळी त्यांनी भाजपवरही जोरदार निशाणा साधला. भाजपने आपल्या राजकीय फायद्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर केल्याचा आरोप करत त्यांनी महिलांना भाजपला मतदान न करण्याचे आवाहन केले. भाजप महिलाविरोधी आहे, म्हणूनच तार्किक विसंगतीचे कारण देऊन मतदार यादीतून महिलांची नावे वगळली जात आहेत, असेही त्या म्हणाल्या. पश्चिम बंगालमध्ये २३ आणि २९ एप्रिल रोजी दोन टप्प्यांत मतदान होणार असून, ४ मे रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी कार्यकर्त्यांना आणि उमेदवारांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.