Deputy Chairman Election : राज्यसभेत १७ एप्रिल रोजी उपसभापतीपदासाठी (Deputy Chairman Election) निवडणूक होणार असून, सत्ताधारी एनडीए हरिवंश यांना या महत्त्वाच्या पदावर पुन्हा निवडून देण्यासाठी प्रयत्न करण्याची शक्यता आहे. हरिवंश यांचा कार्यकाळ ९ एप्रिल रोजी संपल्यानंतर राज्यसभेचे उपसभापतीपद (Deputy Chairman Election) रिक्त झाले होते. त्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी हरिवंश यांना राज्यसभेवर उमेदवारी दिली असून त्यांनी १० एप्रिल रोजी शपथ घेतली. केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते जे. पी. नड्डा जे राज्यसभेत सभागृह नेतेही आहेत, त्यांनी हरिवंश यांच्या नावावर व्यापक एकमत घडवून आणण्याच्या प्रयत्न करत विरोधी पक्षांच्या नेत्यांशी त्यांच्या उपसभापतीपदी (Deputy Chairman Election) पुनर्निवडणुकीबाबत चर्चा केल्याचे समजते. Deputy Chairman Election मात्र, लोकसभेतील उपसभापती पद २०१९ पासून रिक्त असताना, राज्यसभेच्या उपसभापती पदासाठी निवडणूक घेण्याकरिता सत्ताधारी पक्ष दाखवत असलेल्या उत्सुकतेवर काँग्रेस, टीएमसी आणि डाव्या पक्षांनी आक्षेप घेतला आहे. एका अधिकृत घोषणेनुसार, उपसभापती पदासाठी निवडणूक १७ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. राज्यसभेच्या उपसभापतींचे पद रिक्त झाले आहे. सभापतींनी, राज्यसभेच्या कार्यपद्धती आणि कामकाजाच्या नियमावलीतील नियम ७ अन्वये, उपसभापती पदाच्या निवडणुकीसाठी शुक्रवार, १७ एप्रिल, २०२६ ही तारीख निश्चित केली आहे.