Eknath Shinde : नवी मुंबईच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांंच्याविषयी भाजपमध्ये नाराजीचा सूर असल्याचे समोर आले आहे. मंत्री गणेश नाईक यांनी नुकतीच भाजपच्या माजी नगरसेवकांची बैठक घेतली. या बैठकीत एकनाथ शिंदे यांच्याविरोधात नाराजीचा सूर आवळण्यात आला. या नगरसेवकांनी आता शिंदेंची तक्रार थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचे संकेत दिले आहे. यामुळे आता नवी मुंबईचे राजकारण चांगलेच तापणार आहे. बैठकीतील माजी नगरसेवकांनी आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आगामी महापालिका निवडणुकीत शिंदेंसोबत युती नको असे सांगत निवडणूक स्वबळावर लढावी असा आग्रह धरला आहे. यामुळे नवी मुंबईच्या राजकारणात अचानक आलेल्या या ट्वीस्टमुळे सर्वांच्या भुवय्या उंचावल्या आहेत. याप्रकरणी संजय नाईक यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे माजी नगरसेवक मोर्चा देखील काढणार असल्याची माहिती मिळत आहे. जी तक्रार हे माजी नगरसेवक वर्षा बंगल्यावर करणार आहेत, त्यामध्ये शिंदे हे नगरविकास खात्याचे मंत्री असल्याने भाजपच्या माजी नगरसेवकांच्या कामांना ब्रेक लावत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. एका आवड्यात ही तक्रार वर्षा दरबारी जाणार असल्याची माहिती मिळत आहे. नाईक विरुद्ध शिंदे खरंतर नुकतीच ठाणे जिल्हा नियोजन समितीचे बैठक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडली. मात्र, या बैठकीला भाजप नेते आणि वनमंत्री गणेश नाईक यांनी दांडी मारली. त्यामुळे चर्चांना उधाण आले होते. गणेश नाईक हे एकनाथ शिंदे यांच्याविरोधात आक्रमक असल्याचे त्यांनी केलल्या विधानावरून आढळून आले आहे. मागील काही दिवसांपूर्वी नाईक यांनी ठाण्यात आयोजित केलेल्या एका बैठकीत रावणाचा अहंकार दहन केला पाहिजे, असे विधान करत अप्रत्यक्षपणे शिंदेंना लक्ष्य केले होते. तसेच नाईक हे ठाण्यात जनता दरबार आयोजित करत आहेत. हेही वाचा : तब्बल 6 सहा तास उशीर अन्…; विजय थलपतीच्या रॅलीत चेंगराचेंगरी होण्यामागचं कारण समोर