पंतप्रधान मोदींकडून शुभेच्छा –
\n
\nबिहारच्या या नवीन पर्वावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री सम्राट चौधरी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले आहे. “सम्राट चौधरी यांचा उत्साह आणि जमिनीवर काम करण्याचा अनुभव बिहारला विकासाच्या नव्या उंचीवर नेईल,” असा विश्वास पंतप्रधानांनी सोशल मीडियाद्वारे व्यक्त केला. नितीश कुमार यांच्यानंतर आता चौधरींच्या नेतृत्वाखाली बिहार सर्वांगीण प्रगती करेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.
लवकरच मंत्रिमंडळ विस्तार?
\n
\nबिहारच्या नियमानुसार मंत्रिमंडळात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह एकूण ३६ मंत्री असू शकतात. सध्या केवळ प्रमुख नेत्यांमध्येच खात्यांचे वाटप झाले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, आगामी काही दिवसांत मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकतो, ज्यामध्ये आणखी ३३ नवीन मंत्र्यांचा समावेश करण्याची संधी आहे.