नवी मुंबई : नवी मुंबई शहरातील महाराष्ट्र भवन भुखंडावरील काम धिम्या गतीने सुरू असल्याचे आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाकडून प्रतिकात्मक पिंडदान आंदोलन करण्यात आले होते. याप्रकरणी महाराष्ट्र भवनाचे काम मिळवण्यासाठी ठराविक राजकीय नेते दबाव तंत्र वापरत असल्याचा आरोप भाजप आमदार मंदा म्हात्रे यांच्याकडून करण्यात आला आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. निवडणुका जवळ आल्याने सर्व चवताळून आंदोलन करू लागले आहेत, अशी टिका मंदा म्हात्रे यांनी केली. तसेच महाराष्ट्र भवनाचे काम सुरू होऊन एक महिना झाला आहे असेही त्या यावेळी म्हणाल्या. पिंडदान आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र भवनचे काम सुरू होऊन आता महिना झाला, पण अजूनही काही लोक झोपेत आहेत की काय ? बांधकाम व्यावसायिक, ठेकेदारांकडे जाऊन त्यांना राजकीय नेत्यांकडून त्रास दिला जात आहे. बांधकाम व्यावसायिक, ठेकेदारांकडे जाऊन त्यांना राजकीय नेत्यांकडून त्रास दिला जात आहे, असा थेट आरोपच मंदा म्हात्रेंनी केला.