हलक्यात घेऊ नका! १० मंत्री आणि २० आमदारांना कोरोना पॉसिटीव्ह

मुंबई – कोरोनाच्या डेल्टा विषाणूसह ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांमध्ये देशासह राज्यातही वाढतांना दिसत आहे. यामुळे एकीकडे प्रशासन आणि सरकारकडून कोविड प्रतिंबंधात्मक नियमांचे पालन करण्याच्या सुचना नागरिकांना केल्या जात आहेत. तर दुसरीकडे मात्र राजकीय नेते करोना नियमांकडे सर्रास दुर्लक्ष करुन नियम पायदळी तुडवत आहेत.
गेल्या काही दिवसांत राजकीय नेते, आमदार हे विविध लग्नसमारंभात सहभागी होताना दिसले. या लग्नसमारंभात मोठी गर्दी झाल्याचंही दिसून आलं आणि हीच गर्दी कोरोनाची सुपरस्प्रेडर ठरल्याचं दिसत आहे.
राज्यातील मंत्रिमंडाळातील काही मंत्र्यांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. राज्यातील १० मंत्री आणि २० आमदारांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. “जर यापुढेही राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत राहीली तर राज्य सरकार आणखी कठोर निर्बंध घालू शकते,” असे संकेतही पवार यांनी दिले.




