लासुर्णे – लासुर्णे (ता. इंदापूर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ सार्वजनिक बांधकाम, मृद व जलसंधारण, वने, दुग्ध व मत्सव्यवसाय विकास व सामान्य प्रशासन राज्यमंत्री
दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते करण्यात आला.
गेल्या 21 वर्षात पुणे जिल्ह्यात पोलिओचा एकही रुग्ण आढळला नाही. पुणे जिल्ह्यात 21 जानेवारीपर्यंत पल्स पोलिओ लसीकरण मोहीम सुरु राहणार आहे. पाच वर्षापर्यंतच्या सर्व बालकांना पोलिओ लसीकरण करणे गरजेचे आहे. सुदृढ व निरोगी भारत बनविण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन भरणे यांनी केले.
यावेळी छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अमोल पाटील, जिल्हा परिषदेच्या सदस्या वैशाली पाटील, माजी सदस्य प्रतापराव पाटील, पंचायत समिती सदस्या सारिका लोंढे, सरपंच निर्मला चव्हाण, गणेश फडतरे, डॉ. योगेश पाटील, सागर मिसाळ, राजेशकुमार खरात, मनोज कुलकर्णी, नितीन कोळेकर, सुहास डोंबाळे, निखिल भोसले, हर्षवर्धन लोंढे, गटविकास अधिकारी विजयकुमार परीट, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेखा पोळ, वैद्यकीय अधिकारी डॉ. कल्याण देशपांडे, डॉ. सुनील गावडे व सर्व आरोग्य कर्मचारी यावेळी उपस्थित होते.