इंदापूर – इंदापूर पोलीस ठाणे हद्दीत बारामती बायपास येथे अचानक पोलिसांनी नाकाबंदी केली असता एकूण चार पिकअप वाहनांमध्ये 21 जनावरे कत्तलीसाठी वाहतूक करताना पोलिसांना सापडली. ही जनावरे वाहतूक करण्यासाठी चार पिकअप वाहने वापरण्यात आली होती ती इंदापूर पोलिसांनी वाहने जप्त केलेली आहेत. 34 लाख रकमेचा मुद्देमाल केवळ इंदापूर पोलिसांच्या सतर्कतेमुळे पकडण्यात आला आहे त्यामुळे पोलिसांचे अभिनंदन होत आहे.
यासंदर्भात प्राण्यांना निर्दयपणे वागवणे व इतर कलमांसह इंदापूर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर व सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर धनवे, महेश माने, पोलीस उप निरीक्षक सुधीर पाडुळे, सहायक फौजदार सतीश ढवळे, काझी, पोलीस नाईक अमोल गायकवाड, कॉन्स्टेबल रोहित यादव व होमगार्ड सूरज पोटफोडे यांनी कारवाईत सहभाग घेतला.