Police Transfer | Maharashtra Police – राज्य पोलीस दलातील सहाय्यक पोलीस आयुक्त आणि पोलीस उपअधीक्षक दर्जाच्या 29 पोलीस अधिकार्यांची नुकत्याच बदल्या करण्यात आल्या आहेत. गृहविभागाचे सहसचिव व्यकंटेश भट यांनी बदल्याचे आदेश जारी करताना बदली झालेल्या पोलीस अधिकार्यांनी त्यांच्या नव्याने दाखविण्यात आलेल्या बदलीच्या जागी तातडीने रुजू होण्याचे आदेश दिले आहेत. मुंबई पर्यटन सहाय्यक पोलीस आयुक्त- पोलीस उपअधीक्षक दर्जाच्या 29 पोलीस अधिकार्यांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यात मुंबईचे सहाय्यक पोलीस आयुक्त दौलत आबाजी साळवे यांची पिंपरी-चिंचवड, शशिकिरण बाबासो काशिद यांची अकोला उपविभागीय पोलीस अधिकारी, मनिषा सदाशिव नलावडे यांची राज्य गुप्तवार्ता विभागाच्या अप्पर पोलीस उपायुक्त, विजय शंकरलाल जैस्वाल यांना दहशतवाद विरोधी पथकाची जवाबदारी दिली आहे. तसेच, अजीत राजाराम टिके यांची सातारा ग्रामीणच्या उपविभागीय पोलीस अधिकारी, फोर्स वनचे पोलीस उपअधीक्षक सुनिल रामदास लाहिगुडे यांची मुंबई, मिरा-भाईंदर-वसई-विरारचे सहाय्यक पोलीस आयुक्त उमेश शंकर माने यांची भंडारा उपविभागीय पोलीस अधिकारी, ठाण्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त अमोल विलास कोळी यांची गडचिरोली उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे.