मुंबई – डिजिटल अरेस्ट सारख्या सायबर गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याच्या अरोपांखाली गेल्या 10 दिवसांमध्ये मुंबई पोलीसांनी 7 जिल्ह्यांमधून 13 जणांना अटक केली आहे. 18 नोव्हेंबर रोजी स्थापन करण्यात आलेल्या 13 पोलीसांच्या पथकाने सोलापूर, पुणे, नागपूर, सातारा, नाशिक आदी जिल्ह्यांसह इतरत्र ठिकाणांहून 13 लोकांना अटक केली. पोलीसांनी दिलेल्या माहितीनूसार, मुंबईत डिजिटल अरेस्टचे १४२ गुन्हे घडले आहेत ज्यात एकूण ११४ कोटी रुपये गुंतले आहेत. सायबर फसवणुकीतून पैसे जमा करण्यासाठी आणि हस्तांतरण करण्यासाठी ज्यांच्या बँक खात्यांमध्ये पैसे दिले गेले होते अशा लोकांच्या पत्त्यांवर पथके गेली होती. त्यातून या 13 नागरिकांना अटक करण्यात आली आहे. सुनील काशिनाथ भुजबळ (४५) सोलापूर, अनंत माणिक थोरात (५५), जुन्नर, जयेश जयंत झवेरी (५५) विरार, धृमिल राम्बिया (३२) नालासोपारा, विलास मोरे उर्फ रेहान खान (४३), रिझवान शौकत अली खान (४३), रिजवान शौकत शेख (४३), अशवान शेख (४३) रा. भुसारी (41), जीवन बारापात्रे. (३६), यश यादव (२३), मोहन सोनवणे, हितेश मसुरकर (३०) अंकुश मोरे अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.