फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणातील मुख्य आरोपी पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने शरण

फलटण : येथील उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर महिलेच्या आत्महत्या प्रकरणातील मुख्य आरोपी निलंबित पीएसआय गोपाळ बदने हा शनिवारी रात्री उशिरा फलटण पोलीस ठाण्यात हजर झाला आहे. कालपासून पीएसआय बदने पोलिसांना गुंगारा देत होता. तो पोलिसांना सापडत नव्हता. गोपाळ बदने यांचा शोध फलटण शहर आणि फलटण ग्रामीण पोलिसांकडून करण्यात येत होता.
सातारा पोलिसांच्या माध्यमातून पंढरपूर आणि पुणे येथे पथके पाठवण्यात आली होती. मात्र, स्वत: गोपाळ बदने फलटण शहर पोलीस ठाण्यात हजर झाला आहेत. मृत डॉक्टर महिलेनं तिच्या हातावर लिहिलेल्या नोटवर पीएसआय गोपाळ बदने याने चारवेळा बलात्कार केल्याचं लिहिलं होतं. यामुळं मोठी खळबळ उडाली होती.
गोपाळ बदनेची प्रतिक्रिया
मी प्रामाणिक आहे. न्यायालय जो काही निर्णय देईल त्यावर माझा विश्वास आहे. माझा पोलीस प्रशासनावरही विश्वास आहे, असे गोपाळ बदने याने म्हटले आहे.





