इंदापुरात पोलीस, सैनिक भरती प्रशिक्षण
Updated On:
रेडा- कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात इंदापूर आणि जय जवान करिअर अकादमी पुणे यांच्या वतीने पोलीस व सैनिक भरतीचे शाररिक व लेखी परीक्षेचे आयोजन केल्याची माहिती महाविद्यालयाचे वतीने देण्यात आली.
माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, संस्थेच्या उपाध्यक्षा पद्मा भोसले, सचिव मुकुंद शहा यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यामध्ये 379 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. उपक्रमाअंतर्गत मुले, मुलींना धावण्याचे प्रशिक्षण जय जवान ऍकॅडमीचे प्रा. समाधान देशमुख यांनी दिले. पोलीस व सैनिक भरतीच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा घेण्यात आली. याप्रसंगी उपप्राचार्य प्रा. नागनाथ ढवळे, प्रा समाधान देशमुख, प्रा. रवींद्र साबळे, प्रा. फिरोज शेख उपस्थित होते.





