“प्रभाकर साईलच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांनी चौकशी करावी’;मोहित कंबोज यांची मागणी

मुंबई – “प्रभाकर साईलच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांनी चौकशी करावी करावी कारण, प्रभाकर साईलच्या प्रतिज्ञापत्रावर स्थापन झालेल्या SIT मध्ये प्रभाकर हा सर्वात महत्वाचा व्यक्ती होता. प्रभाकर साईल यांच्या आकस्मिक निधनाने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. मृत्यू कसा झाला हे शवविच्छेदन अहवाल सांगेल पण या प्रकरणात आता पोलिसांनी कसून चौकशी केली पाहिजे’अशी मागणी भाजप नेते मोहित कंबोज यांनी केली आहे.
क्या Prabhakar Sail का Mansukh Hiren हो गया ?
SIT जो बनाई थी Prabhakar Sail के Affidavit पे , उसमें Prabhakar सब से जरूरी व्यक्ति था !
Prabhakar Sail की अचानक मृत्यु से बहुत सवाल खड़े होते हैं !
postmortem report बताए गी कैसे मृत्यु हुई !
Police को इसमें जाँच करनी चाहिए !
— Mohit Kamboj Bharatiya – मोहित कंबोज भारतीय (@mohitbharatiya_) April 2, 2022
यातच, मोहित कंबोज यांनी सुद्धा भाजप नेते अतुल भातखळकर यांसारखीच शंका व्यक्त करत ट्विट केले आहे कीमनसुख हिरेन बनला आहे का? पोलिसांनी याची चौकशी करावी” अशी मागणी केली आहे.
दरम्यान,ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आलेला अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या अटकेनंतर किरण गोसावी चर्चेत आला होता. या किरण गोसावीचा खासगी अंगरक्षक प्रभाकर सेल होता. एवढेच नाही तर प्रभाकर सेलने एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावरही आरोप केले होते. 25 करोड रुपये लाच मागितल्याचा आरोप प्रभाकर सेल यांनी वानखेडे यांच्यावर केला होता.





