मुंबई : राज्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस सुरु आहे. तर दुसरीकडे पोलीस भरती सुरु आहे. या पावसामुळे राज्यात अनेक ठिकाणी पोलीस भरतीमध्ये अडथळे येताना दिसत आहेत. मुसळधार पावसामुळे राज्यातील नांदेड आणि अमरावती ग्रामीण पोलीस भरती रद्द करण्यात आली आहे. त्यानंतर आता देवेंद्र फडणवीसांनी या पोलीस भरतीबाबत महत्वाची माहिती दिली आहे. राज्यात ज्या ठिकाणी पाऊस आहे त्या ठिकाणी पोलीस भरती पुढे ढकलावी असे आदेश गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. काय म्हणाले देवेंद्र फडणवीस? राज्यातील काही ठिकाणी पोलीस भरती प्रक्रिया रद्द झाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत मोठं भाष्य केलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, राज्यात ज्या ज्या ठिकाणी पाऊस आहे. तिथे पोलीस भरती पुढे ढकलण्यात आली आहे. पाऊस पुढे वाढणार आहे, त्यानंतर आचारसंहिता लागेल. त्यामुळे चाचणी पुढे गेली आहे असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.