प्रभात वृत्तसेवा शिक्रापूर – शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पाबळ चौक परिसरातील एका हॉटेलवर सुरु असलेल्या वेश्या व्यवसाय काही महिलांनी छापा टाकत पोलिसांची मदत मागवून घेत वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश करीत पाच महिलांची सुटका केली. हॉटेल चालक संतोष सिना पुजारी (वय ३७ वर्षे रा. शिक्रापूर ता. शिरुर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. शिक्रापूर येथील पाबळ चौक परिसरातील एका हॉटेलवर सुरु असलेल्या वेश्या व्यवसायच्या ठिकाणी काही महिलांनी जाऊन छापा टाकत डायल ११२ वर संपर्क करुन पोलिसांची मदत मागितली. सहायक पोलीस निरीक्षक राहुल देशमुख, हवालदार रोहिदास पारखे, पोलीस शिपाई शरद कारकुड, महिला पोलीस शिपाई अस्मिता जोंधळे यांनी याठिकाणी जाऊन बनावट ग्राहक पाठवून छापा टाकला. त्यांना याठिकाणी हॉटेल चालक पाच महिलांना हॉटेलमध्ये ठेवून वेश्या व्यवसाय चालवत असल्याचे दिसून आले. दरम्यान, पोलिसांनी इसमासह पाच महिलांना ताब्यात घेतले. याबाबत पोलीस शिपाई शरद वाल्मिक कारकुड यांनी फिर्याद दिली आहे. महिलांची रवानगी महिला सुधारगृहात केली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल देशमुख हे करीत आहेत.