Narayangaon Gun Case : दहशतवाद विरोधी शाखा व स्थानिक गुन्हे शाखा यांनी संयुक्तरीत्या कारवाई करत नारायणगाव एस टी स्टॅन्ड परिसरात तीन संशयितांना तीन गावठी पिस्तुल, नऊ काडतूसासह जेरबंद करत त्यांच्या कडून मोटार सायकलसह एकूण १ लाख ७५ हजार रू. असा मुद्देमाल हस्तगत केला आहे. धनंजय चक्रधर साळुंखे, वय २० वर्षे, सुरज आप्पासाहेब कडीले, वय १८ वर्षे, अनमोल दादाभाऊ जाधव, वय २७ वर्षे, तिघेही रा. शिरूर पुणे असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या इसमांची नावे असून, ३० ऑक्टोबर रोजी रोजी स्थानिक गुन्हे शाखा व दहशतवाद विरोधी शाखेचे पथक संयुक्तरित्या नारायणगाव पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत असताना, दहशतवाद विरोधी पथकातील पोकों ओंकार शिंदे व मोसीन शेख यांना त्यांचे गोपनीय बातमीदाराकडून बातमी मिळाली होती. नारायणगाव एस.टी.स्टेंड परिसरात एका स्प्लेंडर मोटार सायकलवर तीन इसम संशयित रित्या फिरत आहेत त्यानुसार पथकातील दहशतवाद विरोधी शाखेचे सपोनि प्रकाश पवार यांनी स्था.गु.शा.चे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांना गोपनीय बातमीचा मजकूर सांगून पथकातील स्था.गु.शा. चे सपोनि महोदव शेलार व दहशतवाद विरोधी शाखेचे पथकाने संयुक्तरित्या कारवाई करून नारायणगाव एस.टी. स्टैंड परिसरातून या तीन आरोपींना सापळा रचून ताब्यात घेतले त्यांचे अंगझडतीत प्रत्येकाजवळ अवैध रित्या बाळगलेली एकूण तीन गावठी पिस्तुल, नऊ जिवंत काडतूस व मोटार सायकल मुद्देमाल हस्तगत केला. सदरचे अवैध गावठी पिस्तुल खरेदी करण्यामागे व बाळगण्यामागे त्याचा नेमका कोणता हेतू आहे याकरीता पुढील तपास चालू आहे. सदरची कामगिरी पुणे ग्रामीण चे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षकर रमेश चोपडे, जुन्नर उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांचे मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, दहशतवाद विरोधी पथकाचे सपोनि प्रकाश पवार, स्था.गु.शा. चे सपोनि महादेव शेलार, नारायणगाव पो स्टे चे सपोनि प्रविण सपांगे, पोसई जगदीश पाटील, स्था.गु.शा. व दहशतवाद विरोधी शाखेच्या पथकातील अंमलदार विक्रम तापकीर, दिपक साबळे, मोसीन शेख, संदिप वारे, ओंकार शिंदे, गणेश चंदनशिव, हेमंत विरोळे, अक्षय नवले, रविंद्र जाधव, सुनील कोळी, संकेत जाधव, चेतन पाटील यांनी केली आहे.