कात्रज, दि. 5 (प्रतिनिधी) – माजी नगरसेवक प्रकाश कदम यांच्या विकास निधीतून सुखसागरनगर परिसरातील नागरिकांची सुरक्षा आणि कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी सुखसागर नगर पोलीस चौकीच्या इमारतीचे काम पूर्ण झाले असून पोलीस प्रशासनाने चौकीद्वारे कामकाज सुरू केले.
भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन अंकित सुखसागर चौकीचे लोकार्पण राज्याचे विरोधी पक्षनेते तथा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडला होता. पोलीस उपायुक्त सागर पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांच्या आदेशाने सुखसागरनगर पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वराज पाटील यांनी कामकाज सुरू केले आहे. याचा शुभारंभ करताना यावेळी माजी नगरसेवक प्रकाश कदम, प्रतीक कदम, सुधीर डावखर, निरंजन घाटे आदी उपस्थित होते.