पिंपरी – रात्र गस्तीवर असलेल्या एका पोलिसाला तरुणाने शिवीगाळ करत मारहाण केली. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. ही घटना कासारवाडी गावात बॅंक ऑफ महाराष्ट्र एटीएम जवळ बुधवारी (दि. 28) रात्री एक वाजता घडली.
विलास जानकू गेंगजे (वय 26, रा. पिंपळे गुरव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पोलीस अंमलदार अशोक दत्तात्रय ताथवडे यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी ताथवडे आणि त्यांचे सहकारी पोलीस अंमलदार शिंदे हे दोघेजण कासारवाडीत गस्तीवर होते. बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या एटीएमची पाहणी करीत असताना आरोपी विलास दुचाकीवरून तिथे आला. “इथे बॅरिगेट का लावले आहेत’ असे विचारून फिर्यादी यांना शिवीगाळ करत मारहाण केली. त्यानंतर “तू जिथे राहतो तिथे येऊन मारेन’, अशी धमकीही दिली. याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे.