पुणे : आंदेकर टोळीचा म्होरक्या कृष्णा आंदेकरसह त्याचा चुलतभाऊ शिवराज, अभिषेक यांची नाना पेठ परिसरातून पोलिसांनी धिंड काढली. आंदेकर टोळीची दहशतीला चाप लावण्यासाठी पोलिसांनी ही कारवाई केली. नाना पेठेतील टोळीयुद्ध, तसेच माजी नगरसेवक वनराज आंदेकर याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी गणेश कोमकर याचा मुलगा आयुष कोमकर याच्यावर पिस्तुलातून गोळीबार करून खून करण्यात आल्याची घटना ५ सप्टेंबर रोजी घडली होती. आयुष हा बंडू आंदेकरचा नातू आहे. वनराज आंदेकर खून प्रकरणात गणेश कोमकरला अटक करण्यात आली होती. त्यानंतर बंडू आंदेकरने आयुषच्या खुनाचा कट रचला होता. अमन पठाण आणि यश पाटील यांनी त्याच्यावर गोळीबार केला होता. त्यानंतर वनराज आंदेकर खून प्रकरणातील आरोपी समीर काळे याचा भाऊ गणेश याचा कोंढव्यात गोळ्या झाडून खून केला. आंदेकर टोळीच्या दहशतीला चाप लावण्यासाठी पोलिसांनी त्यांनी केलेल्या बेकायदा बांधकामांवर कारवाई केली. आंदेकरसह साथीदारांची बँक खाती गोठविण्यात आली. आंदेकर टोळीविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुनहेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई करण्यात आली. आंदेकर टोळीचाा म्होरक्या बंडू आंदेकरचा मुलगा कृष्णा, पुतणे शिवराज उदयकांत आंदेकर, अभिषेक उदयकांत आंदेकर यांना तपासासठी नाना पेठेतील डोके तालीम परिसरात आणण्यात आले. पोलिसांनी तिघांची नाना पेठेतील डोक तालीम, तसेच गणेश पेठेतून धिंड काढली.