मॉस्को – कझाकस्तानमध्ये आंदोलकांनी सरकारी इमारतीवर केलेल्या हल्ल्यांमध्ये किमान 12 पोलीस कर्मचारी ठार झाले आहेत. त्याव्यतिरिक्त डझनभर आंदोलक देखील ठार झाले आहेत. हिंसाचारामध्ये एकाचा शिरच्छेद झाल्याचेही आढळून आले आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. कझाकस्तानमधील सर्वात मोठे शहर असलेल्या आर्नलीमधील सरकारी इमारतींवर आंदोलकांनी हल्ला केला, तेंव्हा हा हिंसाचार झाल्याचे पोलिसांच्या प्रवक्त्या सतनाल अझिरबेक यांनी सरकारी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.
अर्नाली शहरात गेल्या काही दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. बुधवारी आंदोलकांनी महापौरांची इमारत पेटवून दिली होती. आंदोलकांच्या हिंसाचारामध्ये एकंदर 354 सरकारी कर्मचारी जखमी झाले असल्याचे शहराच्या सुरक्षा अधिकाऱ्यांच्या कार्यालयाने सांगितले आहे.
कझाकस्तानला तीन दशकांपूर्वी स्वातंत्र्य मिळाले. तेंव्हापासूनच कझाकस्तानमध्ये सातत्याने हिंसाचार सुरू राहिला आहे. नव्याने सुरू झालेल्या आंदोलनाला आटोक्यात आणण्यासाठी रशियाने कझाकस्तानमध्ये शांतिसैनिक पाठवून देण्याची घोषणा केली आहे. कझाकस्तानचे अध्यक्ष कासिम जोमार्त तोकायेव यांनी केलेल्या मागणीमुसार रशियाने ही मदत देऊ केली आहे.
द्रवरुप पेट्रोलियम गॅसच्या वाढत्या किंमतींच्या निषेधार्थ रविवारपासून आंदोलन सुरू झाले आहे. आंदोलनाचे लोण लवकरच आल्माटी आणि राजधानी नूर सुल्तानपर्यंत पोहोचले. हे आंदोलन आटोक्यात आणण्यासाठी अध्यक्ष तोकायेव यांनी कठोर उपाय योजना करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर दंगलग्रस्त भागांमध्ये रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आणि नागरिकांच्या होलचालींवरही निर्बंध घालण्यात आले आहेत.
कझाकस्तानमध्ये अशांतता माजवण्यासाठी इतर देशांमधील दहशतवादी संघटना सक्रिय आहेत, असा आरोप अध्यक्ष तोकायेव यांनी केला आहे. कझाकस्तानला 1991 मध्ये रशियाकडून स्वातंत्र्य मिळाले होते. कझाकस्तानच्या उत्तरेला रशिया आणि पूर्वेला चीनच्या सीमा आहेत. कजाकस्तानमध्ये तेलाचे मोठे साठे आहेत. त्यामुळे कझाकस्तानचे आर्थिक महत्व खूप जास्त आहे. मात्र तरिही अतिशय दारिद्रामुळे देशात कायमच असंतोषाचे वातावरण असते. स्वातंत्र्य मिळाल्यापासून कझाकस्तानमध्ये एकाच पक्षाचे सरकार आहे.