Pune : ‘त्या’ खून प्रकरणी हॉटेलमालकासह दोघांना पोलीस कोठडी

पुणे, दि. 15 – मोबाइल चोरून नेल्याच्या रागातून तरूणास मारहाण करून खून केल्याप्रकरणात हडपसर पोलिसांनी अटक केलेल्या हॉटेल मालकासह वेटरला न्यायालयाने तीन दिवस पोलीस कोठडी सुनावली.
दादा ऊर्फ अनिल अंकुश मोरे (वय 35, रा. मांजरी ब्रुद्रुक. मुळ रा. लगडवाडी, जि. सोलापुर), बाबुराव रघुनाथ जाधव (वय 29, रा. हडपसर. मुळ रा. गादेगाव, जि. सोलापुर) अशी त्यांची नावे आहेत. याबाबत सुरेश दिपलु राठोड (वय 28, रा. मांजरी ब्रुद्रुक. मुळ रा. कर्नाटक) यांनी फिर्याद दिली.
रवि दिप्लु राठोड (वय 33, रा. मांजरी बुद्रुक) असे मयत पडलेल्याचे नाव आहे. 11 मार्च रोजी सकाळी साडे आठच्या सुमारास हडपसर परिसरात ही घटना घडली. दादा मोरे यांचे हडपसर परिसरात शिवशाही नावाचे हॉटेल आहे. याठिकाणी बाबुराव जाधव हा वेटर म्हणून काम पाहत होता.
मोरे यांचा मोबाईल चोरून नेला असल्याच्या रागातून आरोपींनी रवि याच्या पोटामध्ये, पाठीवर व अंगावर जोरात लाथा बुक्यांनी मारहाण करून जबर जखमी केले. त्यामध्ये तो मयत झाला असल्याचे फिर्यादित नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी दोघांना अटक करून पोलिसांनी न्यायालयात हजर केले. त्यावेळी पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली.





