यवतमाळ – प्राध्यापकाने पत्नीचा चाकून वार करून खून केल्याची धक्कादायक घटना यवतमाळ येथे घडली आहे. विमल आरके असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. खून केल्यानंतर आरोपी पती मारोती आरके हा स्वत: पोलिसांसमोर हजर झाला. याप्रकरणी अधिक तपास पोलिस करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आर्णी शहरातील स्वामी समर्थ नगर मध्ये रहिवासी असलेला प्राध्यापक मारोती आरके हा लोणी येथील राष्ट्रीय आश्रम उच्च माध्यमिक विद्यालयावर प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. त्याला नियमित मध्यपानाची सवय होती. घरी रोजच पत्नी विमल सोबत त्याचे भांडण होत असे. रविवारी 13 मार्च रोजी हे भांडण विकोपाला गेले. त्यानंतर दुपारी प्राध्यापक मारोती आरके याने पत्नी विमल आरके हिच्या गुप्त अंगावर चाकुने सपासप वार केले.
गंभीर जखमी विमल यांना उपचारासाठी यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले परंतु उपचारात तिचा मृत्यू झाला. मृतक विमलला दोन लहान मुले आहेत. पत्नीची हत्या केल्यानंतर मारोती आरके ने स्वत: पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. शिक्षण क्षेत्राला कलंक लावणारी घटना आहे. या घटनेचा शिक्षण वर्गाकडून तीव्र रोष व्यक्त केला जात आहे.