पोलीस आयुक्त अमितेशकुमार, आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी वाघोलीतील वाहतूक कोंडीची केली पाहणी
Updated On:

पुणे – पोलीस आयुक्त अमितेश कुमार आणि आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी वाघोली परिसरातील वाहतुक कोंडीची संयुक्तीक पहाणी केली. यानंतर तेथे करावयाच्या तातडीच्या आणि दीर्घकालीन उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली.
यावेळी महापालिका, पीएमआरडीए, पीएमडब्ल्यु, महावितरण, प्रादेशीक परिवहन कार्यालय यांचे अधिकारी उपस्थित होते. तेथील नागरिकांशी संवाद साधून त्यांच्याही समस्या ऐकूण घेतल्या. यानंतर संबंधीत विभागांना पुर्तता करुन घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.





