मैत्रिणीचा खून करणाऱ्याला पोलीस कोठडी

दुसऱ्या तरूणासोबत संबंध असल्याच्या संशयावरून केले कृत्य

पुणे – दुसऱ्यासोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून चाकुने वार करून मैत्रिणीचा खून करणाऱ्याला चंदननगर पोलिसांनी अटक केली. त्याला 27 जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला.

किरण अशोक शिंदे (वय 26, रा. थेरगाव) असे पोलीस कोठडी झालेल्याचे नाव आहे. वीणा प्रीतम पटेल (वय 23, चंदननगर) असे खून झालेल्या तरूणीचे नाव आहे. किरण याचा मित्र प्रकाश बापू गपाट (वय 24, रा. थेरगाव) याने याबाबत फिर्याद दिली आहे. ही घटना 11 जून रोजी रात्री 10 च्या सुमारस चंदननगर येथे घडली. वीणा हिचे किरणसोबत प्रेमसंबंध होते. मात्र, ती ज्या कंपनीत काम करते. तेथील तरूणाशी तिचे संबंध असल्याचा संशय किरण याला होता.

त्यामुळे तो सहा महिन्यापासून तणावाखाली होता. धोका दिला असल्याचे सजून त्याने चाकुने हात, छाती, पोट आणि तोंडावर वार करून तिचा खून केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणात पोलिसांनी किरण याला न्यायालयात हजर केले.

त्यावेळी गुन्ह्यातील चाकु जप्त करण्यासाठी आणि इतर तपासासाठी त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकील वामन कोळी यांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.