मुंबईतील पूल अपघाता प्रकरणी महानगरपालिकेच्या सहाय्यक अभियंत्यास पोलिस कोठडी

मुंबई – छ्त्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील हिमालय पादचारी पूल कोसळून झालेल्या अपघाता प्रकरणी, मुंबई पोलिसांनी अटक केलेल्या सह सहाय्यक अभियंता एस एफ काकुल्टे यांना ५ एप्रिलपर्यंत न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे.

मुंबईतील छ्त्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील हिमालय पादचारी पूल कोसळल्या प्रकरणी काल मुंबई पोलिसांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सहाय्यक अभियंता एस एम काकुल्टे यांना अटक केली होती. त्यानंतर आज पोलिसांनी काकुल्टे यांना न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने ५ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

या दुर्घटनेत ६ जणांना आपले प्राण गमवावे लागले होते तर इतर अनेकजण जखमी झाले होते. याघटनेनंतर  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनास्थळी भेट दिली होती. तसेच सीएसएमटी पूल दुर्घटनेतील जखमींची सेंट जॉर्ज रुग्णालयात जाऊन विचारपूस केली होती. पूल दुर्घटनेची प्राथमिक जबाबदारी कोणाची हे तातडीने निश्चित करण्याचा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिला होता.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.