महिलेला अंघोळ करताना बघण्याचा प्रयत्न, मुंबई पोलिसातील पोलिस विनयभंगाच्या गुन्ह्यात अटक

मुंबई – राज्यात एकीकडे शक्ती कायद्याचा गाजावाजा सुरु आहे तर दुसरीकडे महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत आहे. विशेष म्हणजे ज्यांच्या खांद्यावर सरंक्षणाची जबाबदारी आहे त्यांचाही यामध्ये मोठ्या प्रमाणात समावेश आहे. त्यामुळे महिलांची सुरक्षा करणार तरी कोण असा प्रश्न सद्या उपस्थित झाला आहे.
अशीच एक घटना मुंबई पोलिस खात्यातून समोर आली आहे. महिला बाथरूम मध्ये अंघोळ करत असताता तिला बघण्याचा पर्यंत मुंबई पोलिसातील एका पोलिस कर्मचाऱ्याने केला आहे. या प्रकरणी या कर्मचाऱ्याविरोधात विनयभंगचा गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली आहे.
अक्षय चौगुले, वय 31 असे पोलिस खात्यात अंमलदार म्हणून कार्यरत असलेल्या आरोपीचे नाव आहे. भोईवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे. धक्कादायक म्हणजे या आरोपी अक्षय वर हा चौथा गुन्हा आहे.
भोईवाडा पोलिस ठाण्यात विनयभंग आणि चोरीच्या गुन्ह्या़ची नोंद आहे. तर रफी अहमद किडवाई मार्ग पोलीस ठाण्यातही त्याच्यावर विनयभंगचा गुन्हा दाखल आहे. आरोपीस आधी 2018 मध्ये पोलिस खात्यातून निलंबितही करण्यात आले होते.





