कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. विजय माहेश्वरी
Updated On:

मुंबई – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. विजय लक्ष्मीनारायण माहेश्वरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या जैवरसायनशास्त्र (बायोकेमिस्ट्री) विभागातील वरिष्ठ प्राध्यापक तसेच विभाग प्रमुख म्हणून डॉ. विजय लक्ष्मीनारायण माहेश्वरी कार्यरत आहेत. राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी आज डॉ माहेश्वरी यांची नियुक्ती जाहीर केली आहे.
विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक प्रदीप पाटील यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे कुलगुरुपद रिक्त झाले होते. त्यानंतर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरु प्राध्यापक ई. वायुनंदन यांचेकडे सदर पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता.
फोटो आहे

