पु. ना. गाडगीळ आणि सन्स आता ठाण्यात; सुवर्ण परंपरेचा नवा अध्याय

ठाणे | सोन्या-चांदीच्या व्यवसायातील प्रतिष्ठित आणि विश्वासार्ह नाव पु. ना. गाडगीळ आणि सन्स यांनी ठाणेकर ग्राहकांसाठी भव्य दालनाचे उद्घाटन केले आहे. २ मार्च २०२५ रोजी, श्रुष्टी प्राईम, गोखले रोड, ठाणे येथे या नव्या दालनाचे दिमाखदार उद्घाटन करण्यात आले. गेल्या अनेक वर्षांपासून ग्राहकांकडून होत असलेल्या आग्रहामुळे हे दालन सुरू करण्यात आले असून, आता ठाणेकरांना पु. ना. गाडगीळ यांच्या उत्कृष्ट सेवा, दर्जेदार दागिने आणि पारदर्शक व्यापार नीतीचा थेट अनुभव घेता येणार आहे.
ठाणेकरांची बहुप्रतीक्षित मागणी पूर्ण – विश्वास आणि पारदर्शकतेची परंपरा
पु. ना. गाडगीळ आणि सन्स यांच्याकडे ठाण्यात दालन सुरू करण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत होती. संस्थेच्या निष्पक्ष व्यापार धोरणे, उत्कृष्ट ग्राहक सेवा आणि प्रामाणिक व्यवसाय परंपरा यामुळे ग्राहकांचा विश्वास सतत वाढत गेला आहे. ठाणेकर ग्राहकांनीही संस्थेच्या गुणवत्तेवर आणि पारदर्शकतेवर अपार प्रेम दाखवले आहे.
उद्घाटन सोहळ्यात उपस्थित असलेल्या एका ग्राहकाने आनंद व्यक्त करत म्हटले, “आम्ही पु. ना. गाडगीळ आणि सन्सचे ग्राहक आहोत आणि त्यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. त्यांच्या शुद्धतेवर आणि दर्जेदार दागिन्यांवर आम्ही नेहमीच विसंबून राहतो. आता ठाण्यात दालन सुरू झाल्यामुळे आमच्यासाठी दागिन्यांची खरेदी अधिक सोयीस्कर आणि आनंददायी झाली आहे.”
उद्घाटन सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद
२ मार्च रोजी पार पडलेल्या उद्घाटन सोहळ्यात ग्राहकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. पारंपरिक तसेच आधुनिक दागिन्यांच्या अद्वितीय संग्रहाचा ग्राहकांनी मनमुराद आनंद घेतला. सोन्या, हिऱ्याच्या आणि चांदीच्या दागिन्यांच्या नवनवीन डिझाइन्स आणि उत्कृष्ट कारागिरीने उपस्थित ग्राहकांना भुरळ घातली.
दालनाचे उद्घाटन पु. ना. गाडगीळ आणि सन्स चे प्रवर्तक आणि संचालक अजित गाडगीळ यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी त्यांनी सांगितले, “ठाणेकर ग्राहक आमच्यासाठी नेहमीच खास राहिले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून आम्हाला ठाण्यात दालन सुरू करण्याबाबत सतत विचारणा होत होती. आम्ही ग्राहकांच्या विश्वासाला प्राधान्य देतो आणि त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा नेहमीच प्रयत्न करतो. पु. ना. गाडगीळ आणि सन्स हे केवळ दागिन्यांचे ब्रँड नसून, विश्वास आणि गुणवत्तेचे प्रतीक आहे. या नव्या दालनाच्या माध्यमातून ठाणेकरांना आमच्या उत्तम ग्राहकसेवेचा, उत्कृष्ट दागिन्यांचा आणि पारदर्शक व्यापार नीतीचा अनुभव मिळेल, याचा आम्हाला आनंद आहे. ठाणेकरांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा आणि नव्या दालनास भेट द्यावी.”
ग्राहकांसाठी खास उद्घाटन ऑफर्स – ९ मार्चपर्यंत उपलब्ध
ठाणे दालनाच्या शुभारंभानिमित्त ग्राहकांसाठी खास सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत. या ऑफर्स ९ मार्च २०२५ पर्यंत लागू असतील.
– सोन्या दागिन्यांच्या घडणावळीवर फ्लॅट २०% सूट
– हिऱ्याच्या दागिन्यांच्या घडणावळीवर फ्लॅट ५०% सूट
संस्थेच्या तर्फे ग्राहकांना लवकरात लवकर या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पु. ना. गाडगीळ आणि सन्स – पारदर्शक व्यापाराचा विश्वासार्ह वारसा
पु. ना. गाडगीळ आणि सन्स हे केवळ उत्कृष्ट दागिन्यांसाठीच नव्हे, तर प्रामाणिक व्यवहार, पारदर्शक व्यापार नीती आणि उत्कृष्ट ग्राहकसेवेसाठी प्रसिद्ध आहेत.
– १९३ वर्षांचा विश्वास आणि परंपरा
– १००% शुद्धता आणि प्रमाणित दागिने
– उच्च दर्जाची आणि वैयक्तिक ग्राहक सेवा
– दागिन्यांच्या नवनवीन आणि वैविध्यपूर्ण डिझाइन्स
ठाणेकरांसाठी सुवर्णसंधी – आजच भेट द्या!
तुम्ही जर अद्याप पु. ना. गाडगीळ आणि सन्स, ठाणे येथे भेट दिली नसेल, तर आजच या लक्झरी, परंपरा आणि उत्कृष्ट कारागिरीचा अनुभव घ्या आणि तुमच्या खास क्षणांना अधिक आनंददायी बनवा.
– पत्ता: श्रुष्टी प्राईम, गोखले रोड, ठाणे
– संकेतस्थळ: www.pngadgilandsons.com
– संपर्क: शिवराज कणसे – ८९५६४१८३३८






