तळेगाव – चिंचवडमधील यशस्वी 51 व्या दालनाच्या उद्घाटनानंतर, ’पीएनजी ज्वेलर्स’ने तळेगावात नवीन दालन 16 मार्चपासून सुरू करून आपल्या विस्तारला गती दिली आहे. तळेगाव दाभाडे येथे सुरू करण्यात आलेल्या या 4,000 चौरस फूट क्षेत्रफळाच्या भव्य दालनाचे उद्घाटन बॉलिवूड अभिनेत्री चित्रांगदा सिंग यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ’पीएनजी ज्वेलर्स’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. सौरभ गाडगीळ, पराग गाडगीळ आणि ’पीएनजी ज्वेलर्स’च्या कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. या दालनात सोने, हिरे, चांदी त्याचबरोबर प्लॅटिनमचे दागिने उपलब्ध असून पारंपरिकतेसह आधुनिक शैली असलेल्या दागिन्यांचा मनमोहक संग्रह पाहायला मिळणार आहे. उद्घाटनाच्या निमित्ताने, ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स जाहीर करण्यात आल्या असून, सोन्याच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर 20% पर्यंत सवलत आणि हिर्याच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर 100% पर्यंत सवलत देण्यात येत आहे. ’पीएनजी ज्वेलर्स’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ सौरभ गाडगीळ म्हणाले, चिंचवड दालनाच्या यशस्वी उद्घाटनानंतर आम्ही महाराष्ट्रात ’पीएनजी ज्वेलर्स’चा विस्तार आणखी वेगाने करण्याचा प्रयत्न करत आहोत. या नव्या दालनामुळे, ग्राहकांना पारंपरिक आणि आधुनिक कारागिरीचा सुंदर संगम असलेले दागिने सहज उपलब्ध होतील याची खात्री आहे. ’पीएनजी ज्वेलर्स’ भारतात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या ब्रँडच्या विस्तारीकरणाला चालना देत आहे.