पणजी : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज गोवा दौऱ्यावर असून आपल्या दौऱ्यादरम्यान गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या आठवणींमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गहिवरून आले. एका जाहीर सभेला संबोधित करताना पंतप्रधानांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून देताना म्हंटले की, “मी गोवा दौऱ्यावर असून देखील मनोहर पर्रिकरजी माझ्यासोबत नसल्याची ही पहिलीच वेळ. मी याआधी देखील खूपदा गोवा दौऱ्यावर आलो मात्र माझ्यासोबत नेहमी मनोहर पर्रिकरजी असायचे. आज पर्रिकरजी आपल्या सोबत नाहीयेत याची खंत मनाला वाटते मात्र आपल्याला आता मनोहर पर्रिकरजी आपल्यात नसल्याचे सत्य स्वीकारावे लागेल. मनोहर पर्रिकरांनी आपल्या कार्यामधून जनतेच्या हितासाठी कशाप्रकारे काम करावे याचा आदर्श आपल्या समोर ठेवला आहे.”
PM Modi in Panaji, Goa: I have been coming to Goa for years now, for party's work. It is for the first time that Manohar ji is not here. We will have to accept that Manohar ji is not with us today but Manohar ji showed us how a person can work for people's welfare with honesty. pic.twitter.com/8gviGaPHWo
— ANI (@ANI) April 10, 2019