पुणे जिल्हा | पाबळला ‘पीएमपीएमएल’ बसचे उत्स्फूर्त स्वागत

Updated On:
पुणे जिल्हा | पाबळला ‘पीएमपीएमएल’ बसचे उत्स्फूर्त स्वागत

पाबळ – पाबळ ते पुणे मनपा अशी पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या माध्यमातून बस सेवा शनिवारी (दि. 29) रोजी सुरू करण्यात आली आहे. दरम्यान जातेगाव बुद्रुक, धामारी, मुखई आणि पाबळ येथे आलेल्या दोन बसेसचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.

दरम्यान पाबळ येथे या बसेसचे स्वागत करण्यासाठी अलोट गर्दी झाली होती. यावेळी बसेसचे वाद्यां च्या गजरात व फटाके फोडून ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. यावेळी महिलांनी पूजा करून पेढे वाटले तर बसचालक व वाहकांचा सत्कार करण्यात आला. स्वागतासाठी सर्वपक्षीय नेते व कार्यकर्त्यांची उपस्थिती व सर्वांनी केलेले स्वागत यामुळे उपस्थितांनी आनंद व्यक्‍त केला.

यावेळी प्रमुख नेते भगवान शेळके, प्रकाश पवार, सुरेश पलांडे, सुभाष उमाप, दत्तोबा भगत, पाबळचे सरपंच मारुती शेळके यांसह पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय सचिव नुरुद्दीन इनामदार, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आणखी संबंधित बातम्या

Pimpri-Chinchwad : गणेशोत्‍सवात पीएमपी, मेट्रोची कोटीची उड्डाणे

2026-09-30 07:58:49

Pimpri-Chinchwad : गणेशोत्‍सवात पीएमपी, मेट्रोची कोटीची उड्डाणे

Shirur News: अवैध गुंठेवारी व बांधकामांचा सुळसुळाट! शिरूर तालुक्यात प्रशासनाचे दुर्लक्ष; ग्रामपंचायतींची सुविधा देताना दमछाक

2026-09-29 03:30:12

Shirur News: अवैध गुंठेवारी व बांधकामांचा सुळसुळाट! शिरूर तालुक्यात प्रशासनाचे दुर्लक्ष; ग्रामपंचायतींची सुविधा देताना दमछाक

Gram Panchayat Administrator : शिरुर तालुक्यातील 71 ग्रामपंचायतींवर प्रशासक; एकाच अधिकाऱ्याकडे सात-आठ गावांचा भार

2026-09-11 16:06:35

Gram Panchayat Administrator : शिरुर तालुक्यातील 71 ग्रामपंचायतींवर प्रशासक; एकाच अधिकाऱ्याकडे सात-आठ गावांचा भार

PMPML Bus: गणेशोत्सवासाठी पीएमपीएमएल सज्ज; नियोजनाला सुरुवात

2026-09-05 10:10:06

PMPML Bus: गणेशोत्सवासाठी पीएमपीएमएल सज्ज; नियोजनाला सुरुवात

Inspiring Story: ९० रुपयांसाठी आजीचा एसटीने प्रवास! शिक्रापुरात आजींच्या प्रामाणिकपणाची मोठी चर्चा

2026-07-05 03:00:31

Inspiring Story: ९० रुपयांसाठी आजीचा एसटीने प्रवास! शिक्रापुरात आजींच्या प्रामाणिकपणाची मोठी चर्चा