PMC Exit Poll: 41 प्रभाग आणि 165 नगरसेवकांच्या जागा असलेल्या पुणे महानगरपालिकेत मतदान पार पडले असून एक्झिट पोलचे आकडे समोर येत आहेत. साम टीव्हीच्या एक्झिट पोलमध्ये पुण्यात पुन्हा एकदा भाजपचीच सत्ता येणार आहे. भाजप ७० जागा जिंकण्याची शक्यता आहे. अजित पवारांच्या राष्टवादी काँग्रेसला ५६ जाग मिळण्याची शक्यता आहे. शिंदेंच्या शिवसेनेला १२ तर ठाकरेंच्या शिवसेनेला ५ जागा मिळू शकतात, असा अंदाज वर्तवण्यात आलाय. पुण्यात काँग्रेसला ८ जागा मिळू शकतात . मनसेला २ तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला १० जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली. ‘प्राब’च्या एक्झिट पोलनुसार पुण्यात भाजपला 93, शिवसेना शिंदे गटाला 6, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 43 जागा मिळणार असल्याचा अंदाज आहे. तसेच शिवसेना ठाकरे गटाला 7, शरद पवार गटाला 8, कॉंग्रेसला 8 आणि मनसेला शून्य जागा मिळणार असल्याचा अंदाज प्राबने वर्तवला आहे. दरम्यान, उद्या शुक्रवारी 16 जानेवारीला मतमोजणी होणार असून प्रत्यक्ष मतमोजणीनंतरच समजेल की मतदारांनी कोणाला कौल दिला आहे आणि कोणाची सत्ता येईल.