प्रभात वृत्तसेवा पुणे – गेल्या दहा दिवसांत भाजपने घेतलेले परिश्रम, घरोघरी पोहोचलेला प्रचार आणि नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद यामुळे प्रभाग क्रमांक २५- शनिवार पेठ, महात्मा फुले मंडई परिसरात शहरातील सर्वात मोठ्या फरकाने विजयी होण्याचा विश्वास भाजपाचे उमेदवार राघवेंद्र (बाप्पू) मानकर यांनी व्यक्त केला. प्रचाराच्या अखेरच्या दिवशी काढलेल्या बाइक रॅलीवेळी ते बोलत होते. आमदार हेमंत रासने यांच्या मार्गदर्शनाखाली मंडल अध्यक्ष, आघाड्यांचे प्रमुख, प्रभाग अध्यक्ष, बूथ प्रमुख, शक्तिकेंद्र प्रमुख, तसेच कार्यकर्त्यांच्या परिश्रमामुळे सर्वात मोठ्या विजयाचा आम्हाला आत्मविश्वास असल्याचे मानकर म्हणाले.भाजपचे उमेदवार राघवेंद्र ऊर्फ बाप्पू मानकर, स्वरदा बापट, कुणाल टिळक आणि स्वप्नाली पंडित हे उमेदवार असून, प्रचाराच्या शेवटच्या दिवशी भव्य बाइक रॅलीचे आयोजन केले होते. रॅलीममध्ये माजी नगरसेवक दिलीप काळोखे, राजेश येनपुरे, माजी नगरसेविका गायत्री खडके, उदय लेले, मंडल अध्यक्ष अमित कंक, शहर चिटणीस मनोज खत्री, मंडल सरचिटणीस नीलेश कदम, किरण जगदाळे, संतोष फडतरे, शहर पदाधिकारी प्रणव गंजीवाले, महिला आघाडीच्या मोहना गद्रे, रुपाली कदम, सुरेखा पाषाणकर, उज्ज्वला पावटेकर, प्रभाग अध्यक्ष सुनील रसाळ, युवा मोर्चाचे श्रेयस लेले, तसेच सर्व भाजपा बूथ प्रमुख, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि बाप्पू मानकर मित्रपरिवाराचे सदस्य उपस्थित होते.